उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना :
उत्तर : १) एका वर्षात एकापेक्षा जास्त पिके यशस्वीपणे घेणे.
२) हेक्टरी उत्पादन जास्त मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने जलसिंचन करणे.
३) खात्रीपूर्वक आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून सुरक्षित शेती करणे.
४) नगदी पिके घेण्यासाठी योग्य पद्धतीने पुरेसे इतके पाणी उपलब्ध करणे.
नवीन काय शिकलात ?
उत्तर : आजचे पाण्याचे चित्र पाहिले तर हेच जलस्रोत कोरडे पडताना दिसत आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासत आहे. दैनंदिन जीवनात व शेतीत पाण्याला मोलाचे महत्त्व आहे. सिंचनाचे पारंपारिक पाट पाणी देण्याऐवजी सूक्ष्म सिंचनाचा (ठिबक व तुषार) वापर केल्यास ५०% पेक्षा जास्त पाण्याची बचत होते हे प्रत्यक्ष शिकायला मिळाले.
निष्कर्ष :
उत्तर : हा अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. सूक्ष्म सिंचनामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी सिंचनासाठी योग्य दाबाने वापरता येते व खतांचा अपव्यय टळतो.
उपक्रमाविषयी आपले मत/अनुभव लिहा :
उत्तर : पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना आवश्यकतेनुसार जे अतिरिक्त पाणी दिले जाते या प्रक्रियेला जलसिंचन असे म्हणतात. पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरणे ही काळाची गरज आहे असा अनुभव आला.
पालकांची मदत :
उत्तर : ज्या-ज्या ठिकाणी अडचण आली, तेथे पालकांनी शेतातील पद्धती समजावून सांगण्यात व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात मदत केली.
पालकांचे मत :
उत्तर : मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गावर अवलंबून आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अंगीकार करणे गरजेचे आहे.
सहकार्य घेतलेल्या व्यक्ती :
उत्तर : १) शाळेतील शिक्षक
२) मित्र / मैत्रीण
३) भाऊ
४) बहीण
५) आई
६) वडील