घटक २ : जलसंधारण

प्रकरण २ : पाणलोट क्षेत्र विकास

उपक्रमाचे नाव :
तुमच्या परिसरामध्ये पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत पूर्ण केलेल्या एका कामाची प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर माहिती घेणे.
उपक्रमाचा उद्देश / महत्त्व :
उत्तर : पाऊस आणि भूजल यांचे संवर्धन व पाणलोट कामांचा प्रत्यक्ष अभ्यास करणे.
उपक्रमासाठी नियोजित कालावधी :
उत्तर : हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागला.
साहित्य व उपकरणे :
उत्तर : १) पेन    २) पेन्सिल    ३) मोबाईल    ४) नोंदवही    ५) पुस्तक इत्यादी.
उपक्रमाची कार्यपद्धती : पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या एका कामाची ठिकाण, क्षेत्र, प्रत्यक्ष कार्यवाही, कालावधी, परिणामकारकता इत्यादी संदर्भात सविस्तर माहिती :

उत्तर : ठिकाण : पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत सातारा या गावी ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.

कार्यवाही :

१) गावात वाहत असलेल्या ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.

२) वनराई बांधण्याची जागा पक्की केल्यानंतर जेव्हा ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाची गती कमी होते, तेव्हा वनराई बंधारे बांधले जातात.

३) बंधाऱ्याची उंची जास्तीत जास्त २ मीटर पर्यंत ठेवता येते.

४) तळाची रुंदी ०.६० मीटर, मधल्या भागाची रुंदी ०.४० मीटर असे वनराई बंधारे उपयुक्त ठरतात.

५) ज्या ठिकाणी ओढ्याची रुंदी जास्त व खोली कमी अशी जागा निवडली जाते.

६) त्या ठिकाणचे पाणी वाहत्या स्वरूपात असावे.

उत्तर : ७) यांचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू व दगड यांच्या साहाय्याने करता येते.

८) हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो म्हणून यास 'वनराई बंधारा' म्हणतात.

९) प्रवाहाच्या कमी रुंदीच्या ठिकाणी निवड यासाठी करण्यात येते. हा बंधारा उभारण्याचा खर्च कमीत कमी असावा व त्याद्वारे जास्तीत जास्त फायदा मिळावा अशी यामागील भूमिका आहे.

* परिणामकारकता :

१) सक्षम जलस्रोतांची निर्मिती होते.

२) पावसाचे वाहून जाणारे पाणी याने अडवण्यात येते व हवे असल्यास अशा प्रकारच्या बंधाऱ्यांची साखळी करून पाणी जमिनीत जिरवता येते.

आकृती / छायाचित्रे :
वनराई बंधारा परिसर व पाणलोट उपचार
आकृती : वनराई बंधारा परिसर व पाणलोट उपचार
उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना :
उत्तर : १) भारतीय जलसंस्कृतीच्या पुनर्माणासाठी पुन्हा एकदा खेड हाच केंद्रबिंदू मानून विचार करावा लागेल.
२) 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणली पाहिजे.
नवीन काय शिकलात ?
उत्तर : पाणी हे पंचतत्त्वांपैकी एक असल्याने मानवी जीवनाप्रमाणेच भारतीय संस्कृतीतही पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळी पाण्याची सुबत्ता होती.
निष्कर्ष :
उत्तर : पावसाचे वाहून जाणारे पाणी तात्पुरत्या व कायमस्वरूपी बंधाऱ्यांनी अडवता येते व भूगर्भात जिरवता येते.
उपक्रमाविषयी आपले मत/अनुभव लिहा :
उत्तर : हा उपक्रम करताना मला खूप चांगला अनुभव आला. यात पाण्याचे मोल समजले. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी साठवणूक करणे व योग्य वेळी त्याचा वापर करणे हे कौशल्य शिकता आले.
पालकांची मदत :
उत्तर : उपक्रमादरम्यान ज्या ठिकाणी अडचणी आल्या, तेव्हा पालकांनी मोलाची मदत केली. पालकांनी जुन्या काळातील पाणलोट कामांची व पर्जन्यमानाबाबत माहिती दिली.
पालकांचे मत :
उत्तर : पावसाचे पाणी जास्तीत जास्त अडवले पाहिजे जेणेकरून त्याचा योग्य वेळी वापर करता येईल. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो त्यामुळे वने व शेती सुरक्षित राहतात.
सहकार्य घेतलेल्या व्यक्ती :
उत्तर : हा उपक्रम करत असताना शिक्षक, आई, वडील, मित्र, बहीण व भाऊ यांचे सहकार्य लाभले.
वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्यांची यादी :
उत्तर : १) वनराई बंधारा पुस्तिका    २) १० वी जलसुरक्षा पुस्तक    ३) जलसंवाद    ४) संदर्भ ग्रंथ
कृती : तुमच्या घराच्या अंगणात दोन कुंड्यांमध्ये एकाच प्रकारची रोपे लावा. एका कुंडीला प्रचलित पद्धतीने आवश्यकतेनुसार महिनाभर पाणी देत रहा. दुसऱ्या कुंडीमध्ये लावलेल्या रोपाच्या बुंध्याजवळ एका लहान मडक्यात पाणी भरा. (मडक्याला खाली एक सूक्ष्म छिद्र असावे.) दोन्ही कुंड्यांना महिनाभर पाणी दिल्यानंतर पाणी बचतीसंदर्भाने तुम्हांला कोणते तंत्र समजले ते लिहा.
वरील कृतीच्या आधारे आपण महिनाभरात किती लीटर पाणी वाचवू शकतो याचे गणित मांडा :

उत्तर : १) दोन कुंड्यांमध्ये एकाच प्रकारची रोपे लावून एका कुंडीला प्रचलित पद्धतीने पाणी दिले असता दररोज ५ लिटर पाणी लागले.

२) पहिल्या कुंडीला (प्रचलित पद्धत) : एका दिवसाला = ५ लिटर  →  महिनाभराचे पाणी = ३० × ५ = १५० लिटर

३) दुसऱ्या कुंडीला (मडके पद्धत / थेंब सिंचन) : एका दिवसाला = २ लिटर  →  महिनाभराचे पाणी = ३० × २ = ६० लिटर


• पहिली कुंडी = १५० ली.
• दुसरी कुंडी = ६० ली.
फरक = १५० - ६० = ९० लिटर पाण्याची बचत झाली!

शिक्षकांचा अभिप्राय स्वाक्षरी व दिनानांकसह :
दिनांक : .................... शिक्षकांची स्वाक्षरी : ....................
← Back

इयत्ता १०वी जलसुरक्षा घटक २ प्रकरण २ पाणलोट क्षेत्र विकास संपूर्ण माहिती

"पाणलोट क्षेत्र विकास" (Watershed Development) मध्ये माथा ते पायथा (Ridge to Valley) या तत्त्वावर आधारित जल व मृदा संधारणाचे उपचार समजावले आहेत. यामध्ये समपातळी चर (CCT), वनराई बंधारे, अनघड दगडी बंधारे आणि मडका सिंचन प्रयोगाचा समावेश आहे.

अभ्यासक्रम व महत्त्वाचे मुद्दे (Key Concepts)

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions - FAQs)

१. पाणलोट क्षेत्र म्हणजे काय?

ज्या विशिष्ट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी नैसर्गिक उताराने एकत्र येऊन एकाच ओढ्याला किंवा प्रवाहाला मिळते, त्या संपूर्ण क्षेत्रास "पाणलोट क्षेत्र" म्हणतात.

२. वनराई बंधारा कसा बांधला जातो?

सिमेंटच्या किंवा खतांच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती व रेती भरून ओढ्याच्या वाहत्या पाण्याला आडवी भिंत रचून वनराई बंधारा बांधला जातो.

३. मडका सिंचन पद्धतीचे काय फायदे आहेत?

मडक्याच्या सूक्ष्म छिद्रांमधून पाणी थेट झाडाच्या मुळांशी पाझरते, बाष्पीभवन होत नाही आणि ७०% पाण्याची बचत होते.

संबंधित शोध संज्ञा (Related Searches)

पाणलोट क्षेत्र विकास स्वाध्याय उत्तरे १०वी जलसुरक्षा घटक २ प्रकरण २ वनराई बंधारा रचना व फायदे माथा ते पायथा उपचार पद्धती मडका सिंचन प्रयोग दहावी Class 10 Watershed Development Guide