उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना :
उत्तर : १) बाष्पीभवन २) सिंचन ३) वापरासाठी घेतलेल्या पाण्याचा हिशोब ४) पाण्याचे संवर्धन व महत्त्व
नवीन काय शिकलात ?
उत्तर : १) पाणी हे जीवन आहे.
२) बाष्पीभवन, सिंचन, घरगुती व उद्योगधंदे वापरासाठी घेतलेले पाणी, जमिनीत मुरून वापरता न येणारे पाणी यांचा विचार जल आराखडा तयार करताना केला जातो.
निष्कर्ष :
उत्तर : गावशिवारातील आदर्श जलस्थिती, हवामान, जलक्षेत्र या सर्वांचा अंदाज घेऊन पाण्याचा ताळेबंद योग्य पद्धतीने आखणे अत्यंत महत्त्वाचे असते.
उपक्रमाविषयी आपले मत/अनुभव लिहा :
उत्तर : हा उपक्रम करत असताना आपणास असे दिसून येते की जून ते ऑक्टोबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावरून जल आराखडा निर्मितीची दिशा मिळते.
पालकांची मदत :
उत्तर : उपक्रमामुळे अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या. जलचक्रामध्ये समाविष्ट बाष्प, पाऊस, प्रवाही जल, अडवलेले जल, जमिनीत मुरणारे जल अशा सर्वच घटकांचा विचार करून दुष्काळात वाढत्या तापमानात पाणी वाटप यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी मदत झाली.
पालकांचे मत :
उत्तर : जल आराखडा बनवताना काही ठिकाणी अडचणी आल्या होत्या, तेव्हा पालकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. पालकांनी जल आराखड्याचे महत्त्व समजावून सांगितले.
सहकार्य घेतलेल्या व्यक्ती :
उत्तर : हा उपक्रम करण्यासाठी मला शाळेतील शिक्षक, पालक व गावातील स्थानिक लोकांची मदत लाभली.
वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्यांची यादी :
उत्तर : १) इयत्ता १० वी जलसुरक्षा पुस्तक २) निसर्गभेट योग्य : डॉ. धोंडे ३) जलसंवाद : डॉ. शशी दलादेशकर ४) जलदिंडी चळवळ : डॉ. येवले