घटक १ : जलशिक्षण
प्रकरण १ : पर्यावरण आणि परिसंस्था
उदा. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम
उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ
उत्तर : जलीय परिसंस्थेचे गोड्या पाण्यातील परिसंस्था व खाऱ्या पाण्यातील परिसंस्था असे दोन मुख्य प्रकार आहेत. गोड्या पाण्यातील जल परिसंस्थेचे स्थिर जलपरिसंस्था आणि प्रवाही जल परिसंस्था असे दोन प्रकार केले जातात. परिसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी पाण्याची नितांत गरज असते. पाणी नसेल तर पोषक द्रव्ये वाहून नेली जाणार नाहीत. जैवविविधता ही पाण्यावरच अवलंबून असल्याने पाणी आणि परिसंस्था ही परस्परावलंबी असून त्यांचा जवळचा संबंध आहे.
१) लोकसंख्या : लोकसंख्या वाढ हा जल परिसंस्था/जलस्रोतांची हानी होण्याचे एक कारण आहे. यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. त्याचप्रमाणे मानवाने आपल्या सुख सोयींसाठी नदी, तलाव, समुद्र या ठिकाणी अतिक्रमण करून त्या ठिकाणी रस्ते, घरे इत्यादी बांधकाम केल्यामुळे जलपरिसंस्था नष्ट होऊ लागल्या आहेत.
२) मानवी हस्तक्षेप : स्थापत्य अभियंते रेल्वे मार्ग, रस्ते, पूल, शहर विकास, सांडपाणी व्यवस्था, सिंचन, पाणी पुरवठा योजना नागरी जीवन समृद्ध करण्यासाठी निर्माण करत असतात.
उत्तर : ३) कीटकनाशके : सध्या बरेच शेतकरी पिकांवरील किडींचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकांचा तसेच तणनाशकांचा वापर करतात. कीटकनाशके पावसाच्या पाण्याबरोबरच वाहत जाऊन ज्या ठिकाणी पाणी साठते अशा ठिकाणी मिसळतात व त्यामुळे त्या ठिकाणी परिसंस्था उपलब्ध व प्राणी त्यांच्यावर परिणाम होतो, नष्ट होऊ लागतात.
४) खनिजे व ज्वालाग्राही तेल : कधी-कधी समुद्र पृष्ठावर अपघातात तेलाची वाहतूकसुद्धा जहाजांतून होत असते. त्यातील तेलाच्या टाक्या फुटून तेल समुद्रावर पसरते. अशा पाण्यामुळे पक्षी, मासे व इतर जलचर नष्ट होतात व परिसंस्थेवर परिणाम होतो.
आकृती : तलाव परिसंस्था (Pond ecosystem)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वी जलसुरक्षा विषयातील घटक १ चे पहिले प्रकरण "पर्यावरण आणि परिसंस्था" हे जलपरिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकांच्या परस्परावलंबनावर आधारित आहे. यामध्ये परिसंस्था संकल्पना, पाण्याचे परिसंस्थेतील स्थान, अन्नसाखळी आणि मानवी हस्तक्षेपामुळे जलपरिसंस्थेवर होणारे दुष्परिणाम यांचा सविस्तर अभ्यास दिलेला आहे.
जलपरिसंस्थेत पाण्यात आढळणारे हिरवे शैवाल (Algae), पानवनस्पती, कमळ आणि वनस्पती प्लवक (Phytoplankton) हे सूर्यप्रकाशाच्या मदतीने प्रकाशसंश्लेषण करून अन्न तयार करणारे मुख्य उत्पादक घटक असतात.
रासायनिक कचरा, सांडपाणी व प्लास्टिक पाण्यात मिसळल्याने पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो, परिणामी मासे व इतर जलचरांचा मृत्यू होतो आणि संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होते.
परिसरातील नैसर्गिक जलस्रोतास भेट देऊन तेथील जैविक व अजैविक घटकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे आणि निसर्गाचा समतोल समजून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.