प्रकल्पाचे नाव :
तुमच्या परिसरात असलेल्या एका धरणास भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांकडून धरण निर्मिती, पाणी साठवण, पाणलोट, पाणी वितरण तसेच विद्युतनिर्मिती सारख्या बाबींची सविस्तर माहिती घ्या.
प्रकल्पाची गरज / महत्त्व :
उत्तर : ग्रामीण भागातील आदर्श जलव्यवस्थापनाची आपल्या देशाची संस्कृती म्हणजेच देशाचा विकास हे समजून घेण्यात आपण कमी पडलो आहोत. आजही आपण विकासाच्या नावाखाली शहरीकरणाचा घाट घालून फक्त नवनवीन समस्यांना जन्माला घालत आहोत. धरणांची निर्मिती, त्यांचा जलसाठा, वीजनिर्मिती आणि शेतीला होणारे पाणी वितरण यांचा प्रत्यक्ष अभ्यास करणे ही काळाची गरज आहे.
गृहीतक :
उत्तर : पाणी हे पंचतत्त्वांपैकी एक असल्याने मानवी जीवनाप्रमाणेच भारतीय संस्कृतीतही पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. धरणांमुळे पाण्याचे योग्य नियोजन होऊन दुष्काळमुक्ती शक्य होते.
साहित्य व उपकरणे :
उत्तर : दुर्बिण, पेन्सिल, मोबाईल, प्रश्नावली, नोंदवही, संदर्भ ग्रंथ, पेन, पुस्तक इत्यादी.
प्रकल्प कार्यवाहीचे नियोजन :
उत्तर : इयत्ता १० वीतील जलसुरक्षा या विषयातील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या परिसरातील धरणांपैकी जवळपास असलेल्या 'कोयनानगर' (कोयना धरण) या धरणाची माहिती घेण्याचे ठरवले.
यासाठी धरणासंदर्भात माहिती घेण्यासाठी खालील मुद्द्यांनुसार नियोजन केले :
१) धरणाचे ठिकाण, २) धरण निर्मिती व इतिहास, ३) पाणलोट क्षेत्र, ४) पाणी साठवण क्षमता, ५) पाणी वितरण व जलविद्युत निर्मिती इत्यादी मुद्द्यांनुसार माहिती संकलित करण्याचे ठरवले.